देवरुख नजीकच्या भंडारवाडी येथील एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळाच्यावतीने १३ ते १५ या कालावधीत जय भंडारी चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य क्रीडा महोत्सव, सत्कार समारंभ व गुणगौरव कार्यक्रमाने हा सोहळा सजणार आहे. यामध्ये १३ रोजी सायं. ६ वा. जय भंडारी चषक किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, ६.३० वा. दहावी, बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व ७ वा.जय भंडारी चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मॅटवर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ८ हजार १९ रूपये, द्वितीय क्रमांकास ६ हजार १९ रूपये, तृतीय क्रमांकास २ हजार १९ रूपये, चतुर्थ क्रमांकास १ हजार १९ रूपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूस होमथिएटर, उत्कृष्ट चढाई १ मिक्सर, उत्कृष्ट पकड १ मोबाईल, प्रत्येक सामन्यांना सामनावीर व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. १५ रोजी रात्री ९ वा. सामाजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार, १० वा. कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांचा क्रीडा प्रेमींनी मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन एस. आर. चॅलेंजर क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.