मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500हून कमी

0

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अधिक धोका असणारी मुंबई प्रत्येक संकटावर मात करत नव्यानं श्वास घेतना दिसू लागली आहे. तिची हीच उर्जा जणू रुग्णांनाही एक सकारात्मक उर्जाच देत आहे असं म्हणायला हरकत नाही. रविवारी मुंबईत एकूण 2403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6,76,475 वर पोहोचला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली. शनिवारी शहरात 2,678 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 18 मार्चला शहरानं 2877 नव्या कोरोनाबाधितांचा इतका कमी आकडा पाहिला होता. त्यानंतर सातत्यानं रुग्णसंख्येचा आलेख चढताच दिसून आला होता. सलग दुसऱ्या दिवशी 3 हजारहून कमी रुग्ण आढळण्याची ही मुंबईसाठीची दुसरी वेळ. तर, 2500 हून कमी रुग्ण आढळण्याची ही मागील 45 दिवसांतील पहिलीच वेळ.रविवारी शहरात 3375 रुग्णांनी या संसर्गावर मात केली. ज्यामुळं कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा 6,13,418 वर पोहोचला. तर, 68 जणांना मागील 24 तासांत मृत्यू झाल्याची माहितीही पालिकेनं दिली.आतापर्यंत मुंबईत 13,817 रुग्णांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता वाढलं असून, हा आकडा 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात 47,416 सक्रिय रुग्ण आहेत. तर, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा थेट 153 दिवसांवर पोहोचला आहे.आरोग्य यंत्रणांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, फ्रंटलाईन वर्कर्सचा हातभार, प्रशासनाची आखणी आणि अर्थात मुंबईकरांची साथ या साऱ्याच्या बळावर सध्या मुंबई या कठीण प्रसंगातही पाय घट्ट रोवून उभी आणि हा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर नेत आहे. त्यामुळं सध्या मुंबईकडे कोरोना संसर्ग नियंत्रणातील आदर्श शहर म्हणूनही पाहिलं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here