केंद्र सरकारच्या दिव्यांग हक्क अधिनियमानुसार तालुक्यातील अनेक दिव्यांगांना लाभ मिळाला आहे. या अधिनियमानुसार आणखी नव्या १५ विविध व्याधींचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कुष्ठरोगाचाही समावेश करण्यात आल्याने कुष्ठरोग रूग्णांनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केले आहे. या अधिनियमानुसार कुष्ठरोग रूग्णांची परवड काहीशी थांबण्यास मदत मिळणार आहे. केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती व हक अधिनियनामुसार नव्याने १५ व्याधींचा दिव्यांग श्रेणीत समावेश केला आहे. यामुळे २०१८ पासून २१ व्याधीग्रस्तांना दिव्यांगतत्व १५ नवीन प्रमाणपत्राचा लाभ मिळणार आजारांचा समावेश आहे. शारीरिक वाढ खुंटणे, मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची २१ आजारांनाही विकृती, मज्जासंस्थेचे जुने मिळणार संरक्षण आजार, अध्ययन, अक्षमता, वाचा व भाषा दोष, दृष्टीक्षीणता, कुष्ठरोग यासह अन्य रूग्णांना आता दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार आहे.सर्व दिव्यांगांना ओळखपत्र अतिजलद मिळण्याच्या दृष्टीने सॉप्टवेअरही अद्ययावत केले आहे. यामुळे गतवर्षी काही कुष्ठरोग व दिव्यांगांनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळाले आहेत. या प्रमाणपत्रामुळे शासकीय, निमशासकीय नोकरी मिळणेही सोपे जाणार आहे. कुष्ठरोग रूग्णांच्या दृष्टीने दिव्यांगत्व प्रमाणपत्र महात्वाचे असल्याने अनेक कुष्ठरोग रूग्णांनी याकरिता शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.या योजनेचा लाभ जिल्ह्यातील २५ पेक्षा जास्त कुष्ठरोग रूग्णांना मिळाला असून लवकरच सर्व कुष्ठरोग रूग्णांना याचा लाभ मिळणे शक्य होईल, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.