चिऱ्याचे दुभाजक पुन्हा कोसळले

0

रत्नगिरी शहरात जयस्तंभ ते दांडा फिशरीज या रस्त्यावर तयार करण्यात आलेले चिऱ्याचे दुभाजक सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या गुणवत्तेविषयी नागरिकांनी वारंवार संशय व्यक्त केला होता. वारंवार कोसळणाऱ्या या दुभाजकांना नेताकारी मंडळीनी झुलता दुभाजक असे नाव देखील ठेवले होते. आता पुन्हा आठवडा बाजार येथे तीन ठिकाणी हा दुभाजक कोसळला आहे. रत्नागिरी नगरपालिकेने आजवर लाखो रुपयांचा खर्च शहरातील दुभाजकांवर केला आहे. प्रत्येक नवीन येणाऱ्या नगराध्यक्षाने आपली कलाकुसर या दुभाजकावर भरून काढली आहे. आता पुन्हा हा दुभाजक निवडणुकीच्या तोंडावर कोसळल्याने चर्चेचा विषय बनला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here