”उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री लाभला हे माझे भाग्य!”

0

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने संयुक्तपणे युद्धपातळीवर यंत्रणा उभी करून त्याची नियोजनबद्धपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे पहिल्या लाटेप्रमाणे मुंबईत दुसरी लाटही नियंत्रणात आली आहे. याला प्रशासकीय इच्छाशक्तीबरोबर राजकीय इच्छाशक्तीही कारणीभूत आहे. कोरोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलचे देश-विदेशात कौतुक होत आहे. आणीबाणीच्या काळात प्रशासकीय यंत्रणेचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कमी होते. मात्र अशाही परिस्थितीत प्रशासनाला स्वातंत्र्य देणारा आणि विश्वास ठेवणारा उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मुंबईला लाभला हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दांत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका राबवत असलेल्या मुंबई मॉडेलची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते अगदी विदेशातही सुरू आहे. या मुंबई मॉडेलचे सूत्रधार असणारे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई मॉडेलच्या यशाचे सूत्र एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही यशासाठी एकच गोष्ट कारणीभूत नसते. यश ही अनेक घटकांनी घडून येणारी प्रक्रिया आहे. कोरोना नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या मुंबई मॉडेल यशस्वी होण्यामागेही महापालिकेची भक्कम प्रशासकीय यंत्रणा तर आहेच, पण या यंत्रणेला आणि या यंत्रणेचा प्रमुख म्हणून मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले निर्णय स्वातंत्र्य ही एक निर्णायक बाब ठरली आहे. त्यामुळे मी महत्त्वाचे निर्णय माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करू शकलो. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आहे. मात्र असे स्वातंत्र्य इतर अनेक मोठय़ा शहरांत कोरोनाविरोधात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱयांना नाही. मुंबईला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री लाभला हे मुंबईकर आणि माझे भाग्य आहे, असे मी समजतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 11-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here