मिरजोळेतील दुकान फोडून रोकड लंपास

0

मिरजोळे-पाडावेवाडी येथील दर्शन जनरल स्टोअरचे शटर उचकटून चोरट्याने १० हजार ५०० रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (ता. २२) रात्री नऊ ते २३ ला सकाळी सहाच्या सुमारास मिरजोळे पाडावेवाडी येथे घडली. तक्रारदार महेश नागेश पाथरवट (वय २६, रा. पाडावेवाडी- मिरजोळे) यांचे पाडावेवाडी येथे दर्शन जनरल स्टोअर्स आहे. चोरट्याने स्टोअर्सचे शटर धारदार हत्याराने उचकटून स्टोअरमधील सुमारे १० हजार ५०० रुपयांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. या प्रकरणी पाथरवट यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here