कर्नाटकचा आंबा आणून फसवून रत्नागिरी मध्ये विकणे म्हणजे रत्नागिरीच्या मातीशी गद्दारी : उदय सामंत

0

“व्यापारी केव्हढाही मोठा असूदे तक्रार आल्यास कारवाई करणार”

रत्नागिरी : कर्नाटकचा आंबा रत्नागिरीत आणून फसवून रत्नागिरीत विकणे म्हणजे रत्नागिरीच्या मातीशी गद्दारी केल्यासारखे आहे. अशा प्रवृत्तीला कायदेशीररित्या ठेचले पाहिजे. व्यापारी केव्हढाही मोठा असुदे तक्रार आल्यास कारवाई करणार असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. हा प्रकार उघड करणाऱ्या आंबा बागायतदाराचे देखील ना उदय सामंतांनी कौतुक केले आहे. कोकणच्या हापूसला ग्राहकांकडून प्रचंड मागणी असते मात्र कर्नाटकी आंबा आणि हापूस भेसळ करून विकला जात असल्याने हापूसच्या दरावर मोठा परिणाम होतो. पुण्या, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची सर्रास विक्री सुरु आहे. मात्र काल एका आंबा बागायतदाराने केलेल्या भांडाफोड मुळे खळबळ उडाली होती. रत्नागिरीतील एक मोठा आंबा व्यापारी, मोठा कॅनिंग वाला आणि निर्यातदार म्हणून ओळख असणारा व्यापारीच कर्नाटक वरून आंबा आणून तो रत्नागिरी हापूसच्या नावाखाली विकत असल्याची धक्कादायक घटना एका रत्नागिरीतील व्यापाऱ्यानेच उघडकीस आणल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:34 PM 11/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here