घरात एकट्या असलेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून ही घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक कोंड भराडे येथे घडली. श्रीमती शकुंतला जगन्नाथराव सुर्वे (वय ७०, रा. कुंभारखाणी बुद्रुक) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत राकेश शांताराम सुर्वे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शकुंतला सुर्वे ही घरामध्ये एकटी होती. रविवारी (ता. २२) संध्याकाळच्या दरम्याने तिने घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
