“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून आता केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीका करताना वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडून दुर्लक्ष करुन सरकार झोपा काढत राहिल्याची टीका केली आहे.ओवेसी म्हणाले की, लसीकरण मोहिमेमध्ये केंद्राला अपयश आले आहे. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा आणि लसींचा पुरवठा करण्यात केंद्राला अपयश आले. लसींच्या वितरणाचा हक्क केंद्राकडे राखीव असल्याने असे घडत आहे. वैज्ञानिकांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतरही सरकारने योग्य उपाययोजना, हालचाली केल्या नाहीत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, अशी टीका ओवेसी यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 11-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here