प्लास्टिकचे मोठे आव्हान संपवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला.
त्यानुसार पूर्व मध्य रेल्वेने काही स्थानकांवर वेडिंग मशीन ठेवल्या असून त्यात एक प्लास्टिकची बॉटल टाकली तर त्याच्या मोबदल्यात पाच रुपये मिळणार आहे.
करायचे काय? :
● सर्वप्रथम वेंडिंग मशीनमध्ये बॉटल टाका.
● त्यानंतर प्रवाशाला आपला मोबाईल नंबरही टाकावा लागेल.
● यानंतर वेंडिंग मशीनमधून प्रवाशाला धन्यवादचा SMS येईल आणि 5 रुपयांचे व्हाऊचर येईल.
● हे व्हाऊचर जास्तीत जास्त ठिकाणी वापरता येईल यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे.
● रेल्वेने यासाठी अनेक मोठे शोरूमच्या कंपनीशी बोलणी सुरू केली असून काही ठिकाणी या व्हाऊचरचा वापरही सुरू झाला आहे.
पहिल्या टप्प्यात देशाच्या 2 हजार स्थानकांवर या वेंडिंग मशीन्स लावल्या जातील.
त्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या वापरलेल्या बाटल्या या वेंडिंग मशीन्समध्ये टाकल्या जातील. नंतर त्याचा पुर्नवापर केला जाईल.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांसह बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी या मशीन्स लावल्या जातील.
चांगला प्रतिसाद : मध्य रेल्वेने बिहारच्या पाटणा जंक्शन, राजेंद्रनगर, पाटणा साहिब आणि दानापूर स्थानकावर या वेंडिंग मशीन्स बसवल्या आहेत. या प्रकल्पाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे
रेल्वेने या प्लास्टिकपासून टीशर्ट आणि टोप्या बनवल्या आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहे.
