जिची प्रतीक्षा होती अखेर ती हाती आलीच..!; ‘ग्लोबल टिचर’च्या ट्रॉफीचं डिसले गुरुजींनी असं केलं स्वागत

0

अखेर ती माझ्या जीवनात आलीच… असं ट्विट करत रणजित सिंह डिसले अर्थात सर्वांच्या लाडक्या डिसले गुरुजींनी ट्विट केलं आणि सर्वांनाच त्यांच्या जीवनातील या आनंदाच्या बातमीबाबत कुतूहल वाटलं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनीच त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. गुरुजींनीही या शुभेच्छांचा स्वीकार केला. ग्लोबल टीचर म्हणून पुस्कार जाहीर झाल्यानंतर या मानाच्या पुरस्काराची ट्रॉफी नेमकी कशी असेच याबाबतही उत्सुकता पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराची बहुप्रतिक्षित ट्रॉफी अखेर डिसले गुरुजींच्या हाती आली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

संपूर्ण देशाप्रमाणेच सबंध महाराष्ट्रासाठी ही मोठ्या अभिमानाची बाब. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली होती. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. डिसले गुरुजींनी त्यांच्या या पुरस्काराची रक्कमही शिक्षणक्षेत्रासाठीच देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय़ घेतला होता.जवळपास पुरस्काराच्या संपूर्ण 7 कोटी रुपयांपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते. ज्यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. कारकिर्दीतील या टप्प्यावर त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. तो एका शिष्यवृत्तीच्या निमित्तानं. ‘ग्लोबल टीचर’ म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली, ज्यामुळं शिक्षण क्षेत्रात त्यांचं नाव आणखीही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 11-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here