स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवण्यात येतील. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या आदेशानेच यंदाचा निवडणुका लढवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेना भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शेतकरी कर्जमाफी आणि जनतेचे अडलेले प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्यांदाच जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता कामाला लागा. असे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले.
पक्षवाढीकडे लक्ष देताना राज्य सरकार म्हणून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (ता. २३) शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिले. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच निवडणुकीची चिंता करू नका, आपली महाविकास आघाडी सक्षम आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी जिल्हाप्रमुखांना दिला.
