रत्नागिरी शहर पदवीधर मंचाने दिला अॅड. दीपक पटवर्धन यांना पाठींबा

0

पदवीधर, सुसंस्कृत नगराध्यक्ष या रत्न नगरीला नगराध्यक्ष म्हणून लाभावा यासाठी रत्नागिरी शहर पदवीधर मंचाने अॅड. दीपक पटवर्धन यांना आपला भक्कम असा पाठींबा दिला आहे. पदवीधर मंचाचे असंख्य कार्यकर्ते यानिमित्ताने प्रचार कार्यात गुंतले आहेत. शहरातील सुशिक्षित मानसिकता असणाऱ्या मतदारांच्या भेटी ते घेत असून या भेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा या मंचाने केला आहे. याच सोबत रत्नागिरी शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील गायक, वादक, अभिनेते व दिग्दर्शक आदी कलाकारांनी देखील अॅड. दीपक पटवर्धन यांना आपला पाठींबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here