आज रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीत राज्यातील मित्रपक्ष आमच्या विरुद्ध लढतोय असे चित्र आहे मात्र याची कोणतीही कल्पना शरद पवार, बाळासाहेब थोरात आदी राज्यातील नेत्यांना नाही. काहींच्या हट्टामुळे आयात केलेला उमेदवार उभा केला आहे. शिवसेनेवर मुस्लीम समाज प्रेम करतो त्याला बाजूला करण्यासाठी भाजपची सुपारी घेऊन हा उमेदवार उभा केला आहे अशी परखड टीका आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादी उमेदवारावर केली आहे.
रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक हि शिवसेनेने रत्नागिरीवासीयांवर लादली असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. या टीकेला उत्तर देताना आ. सामंत म्हणाले कि एव्हढा जर कुणाला पुळका होता तर विरोधात उमेदवारी अर्ज न भरता हि निवडणूक बिनविरोध करायला पाहिजे होती. राहुल पंडित यांनी आपल्या व्यक्तिगत कारणांनी राजीनामा दिल्याने हि निवडणूक होत आहे. राज्यातील महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेसेज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पुरेसा आहे. यामुळे या लढाईत राष्ट्रवादीचा उमेदवार ४ नंबरला राहील असे आ. सामंत म्हणाले
