रत्नागिरी : दैनिक तरुण भारतच्य धडाडीच्या पत्रकार जान्हवी पाटील यांना शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्यांदा पत्रकार जान्हवी विनोद पाटील यांना पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आणि आता शि.म. परांजपे उत्कृष्ट पत्रकार असे दोन पुरस्कार प्राप्त करुन जान्हवी पाटील या कोकणातील पहिली पत्रकार होण्याचाही मान मिळवला आहे. अल्पावधीतच आपल्या मेहनतीने पत्रकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणार्या जान्हवी पाटील यांचे राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे. आजवर जान्हवी पाटील यांनी पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. पत्रकारितेसोबत सामाजिक कार्यात देखील त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो. तसेच अनेक अबला, पिडीत महिला, मनोरुग्ण, आई वडिलांचे छत्र हरवलेली मुले यांसाठी देखील जान्हवी पाटील समजात मोलाचे कार्य करतात. मराठी पत्रकार परिषदेच्या त्या एक क्रियाशील सदस्य आहेत. पत्रकारितेतील या मनाच्या पुरस्काराने आज रत्नागिरीची मान उंचावली असून सर्व स्तरातून जान्हवी पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
