शिवसेनेने मतदारांचा अपमान केला : बाळासाहेब माने

0

पाच वर्षांसाठी रत्नागिरीची थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली होती. मात्र शिवसेनेने नगराध्यक्षांचा जाणीवपूर्वक राजीनामा घेतला गेला. शिवसेनेने मतदारांचा अपमान केला आहे. विकास योजनांचा बोजवारा उडाला आहे. यात शिवसेना अपयशी ठरली आहे. आम्ही आठवड्याचे 24 तास योजना नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू. मुबलक पाणी मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी खास बाब म्हणून रत्नागिरीसाठी दिलेली ६४ काेटी रुपयांची नळपाणीयाेजना दीड वर्षांत पूर्ण करू. पानवल धरणाचे पुनरुज्जीवन करू. शीळ धरणातील पाण्याचा योग्य विनीयोग व्हावा, रस्ते, उद्याने यासाठी निधी आणू, असा विश्वास भाजपचे नेते, माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here