दहा रुपयाच्या शिवभोजनाला मिळाली मान्यता, पहा काय असेल या थाळीचा मेन्यू

0

राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यार गरिबांना १० रुपयात पोटभर जेवण देण्याचे आश्वासन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार आता राज्यात १० रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. राज्य शासनास ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु केले. तर या प्रत्येक भोजनालयात कमाल ५०० थाळी सुरु करण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता राज्याच्या इतर भागात राबविण्यात येईल. असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

तसेच अनुदानित ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रुपये आणि ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असणार आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या १० रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर ती रक्कम त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असेल.

काय असेल या थाळीमध्ये
– ३० ग्रॅमच्या दोन चपात्या
– १०० ग्रॅमची एक वाटी भाजी
– १५० ग्रॅमचा एक मूद भात व १०० ग्रॅमचे एक वाटी वरण
– दुपारी 12 ते 2 या कालावधीत शिवभोजनालये सुरूर राहतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here