पटवर्धन हायस्कूल लसीकरण केंद्रावर ओळखीच्या व्यक्तींना वशील्याने दिले जात आहेत डोस : नागरिकांनी केले आरोप

0

रत्नागिरी : नुकतेच मिस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळाचा प्रकार समोर येत असताना आता पटवर्धन हायस्कुल येथील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था पाहणारेच आपल्या ओळखीच्या माणसांना लस देत आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील व्यवस्थापकांनी आपल्या नातेवाईकांना फ्रंट लाईन वर्कर मध्ये लसीकरण केले असून, दुसरा डोस असताना काहींना वशील्याने पहिला डोस दिला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. या व्यवस्थापकांची रीतसर तक्रार करणार असल्याची माहिती देखील या नागरिकांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:36 AM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here