माजी खा. निलेश राणे, आ. लाड यांचा बुधवारपासून रत्नागिरीत झंझावाती दौरा

0

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी भाजपचे युवा नेते माजी खासदार निलेश राणे, कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड, उद्यापासून (ता. 25) झंझावाती दौरा करणार आहेत. या दोघांची प्रचारात एंट्री महत्त्वाची ठरणार असून भाजपचे पारडे जड होणार आहे. ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

HTML tutorial

शिवसेनेचे थेट निवडून आलेले नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा पक्षाने राजीनामा घेतला. त्यामुळे पाच वर्षांची मुदत असूनही तिसऱ्या वर्षातच निवडणूक लागली. यामुळे रत्नागिरीचे वातावरण ढवळून निघाले आहे. शिवाय खड्डेमय रस्ते, उघडी गटारे, डास फवारणी नसल्याने डेंग्यूची लागण आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी टंचाई. यामुळे ही निवडणूक सत्ताधारी व विरोधकांनीही प्रतिष्ठेची केली आहे.

या निवडणुकीत आता भाजपचे निलेश राणे, कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनीही गांभिर्याने लक्ष घातले आहे. या दोघांच्या प्रचाराच्या तोफा अंतिम टप्प्यात धडाडणार असून याचा भाजपला मोठा फायदा होणार आहे. विविध माध्यमातून हा प्रचार जोर धरत असून भेटीगाठी, कॉर्नर सभा यामुळे प्रचारात रंगत आली आहे.

सध्या भाजपनेही प्रचारात आघाडी घेतली आहे. एकाच वेळी सर्व प्रभागांत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सुशिक्षित नागरीक, विविध आघाड्या कार्यरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर वातावरण ढवळून निघत आहे. शहरवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपने स्वच्छ चारित्र्याचा, पारदर्शक कारभार व प्रशासनाची जाण असणा-या, सुविद्य अशा अॅड. पटवर्धन यांना तिकीट दिले आहे. या खेळीमध्ये भाजपचे पारडे जड आहे. राणे-लाड यांच्या एंट्रीने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here