बिहारमध्ये 25 मे पर्यंत वाढवले लॉकडाऊन

0

पटना : कोरोना साथरोगाचा वाढता प्रकोप लक्षात घेता बिहार सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत 25 मे पर्यंत वाढ केलीय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. यासंदर्भातील ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, सहयोगी मंत्रिमंडळ आणि पदाधिकाऱ्यांसोबत बिहारमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनची समीक्षा केली. त्यात लॉकडाउनमुळे सकारात्मक प्रभाव आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुढचे 10 दिवस म्हणजेच 16 मे ते 25 पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन आठवड्यात राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. एका दिवसात करोना रुग्णांची संख्या 10 हजाराच्या खाली आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. बिहार सरकारने लॉकडाउनचा प्रभाव आमि पुढच्या नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. त्यात अधिकाऱ्यांनी लॉकडाउन वाढण्यावर भर दिला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here