तोडपाणी, राजीनाम्याचे राजकारण करणार्‍या सत्ताधार्‍यांना घरी बसवा – आमदार संजय केळकर

0

रत्नागिरी
ज्या मतदारांनी सत्ताधार्‍यांना पूर्ण बहुमत दिले त्याच मतदारांना पुन्हा अडीच वर्षांत रत्नागिरीकरांना मतदान करायला लावले. सत्ताधार्‍यांनी तोडपाणीचे राजकारण, आपाससातील राजकारण आणि राजीनाम्याचे राजकारण केले. पण रत्नागिरीकर मतदार सूज्ञ आहेत. रत्नागिरी शहर क्रांतीकारकांचे आहे. भाजपने अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या रूपाने सुविद्य, ज्याला या मातीची माहिती आहे, उच्चशिक्षित, स्वच्छ हातांचा उमेदवार दिला आहे. रत्नागिरीकर पटवर्धन यांच्या पाठीशी राहून नक्की परिवर्तन करणार आहेत, असा ठाम विश्‍वास भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
यापूर्वी आमदार केळकर यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. रत्नागिरीशी त्यांचा घनिष्ट संबंध असल्याने आज ते अ‍ॅड. पटवर्धन यांच्या प्रचारासाठी शहरात विविध भागांमध्ये फिरले. त्या वेळी त्यांनी सांगितले की, अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यासारखा सुविद्य, विविध क्षेत्रात रुळलेला, स्वच्छ कारभार असलेला दिला आहे. शहरवासीय पटवर्धन यांच्या पाठीशी उभे राहिले तर विकास काय असतो ते दाखवून देऊ. पालिकेत काही जण तोडपाणी करण्यात स्वहित बघून विकासाला दुय्यम स्थान दिले.
थिबा पॅलेस, पटवर्धन वाडी, बोर्डिंग रोड, गाडीतळ, राजीवडा आदी परिसरामध्ये आमदार केळकर यांनी विविध वयोगटातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. नागरिकांच्या सूचना, मते ऐकून घेतली. पाणी समस्या, खड्डेमय रस्ते याबाबत नागरीकांच्या भावना तीव्र असून या समस्या सोडवण्यासाठी भाजपचा नगराध्यक्ष सक्षम आहे, असे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.

HTML tutorial

भाजपला निवडून रत्नागिरीकरांनी क्रांती करावी

ज्यांना दोन-तीन वर्षांत विकास केला नाही ते आता नगराध्यक्ष बदलून काय विकास करणार हा प्रश्‍न मतदारांना पडला आहे. रत्नागिरी ही क्रांतीकारकांची भूमी आहे त्यामुळे शहरवासीयांनी पालिकेत तोडपाणी करणार्‍यांना घरी बसवा आणि भाजपचे उच्चशिक्षित उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांना विजयी करून क्रांती करा, असे प्रतिपादन ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले.

राजीनामा घेतल्याने नागरिकांमध्ये चीड

शिवसेनेने थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेतला त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड असल्याचे ्रप्रचारादरम्यान दिसून आले. विकासाऐवजी हे खूपच मोठे राजकारण करत असल्याचे नागरिकांशी बोलताना जाणवल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here