“जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”

0

मुंबई : देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर दिला जात असताना, लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. या टेंडरद्वारे सुमारे एक कोटी लसीच्या डोसची मागणी करण्यात येत आहे. यावरून भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:37 PM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here