रत्नागिरी दि २४:- चालू दशकातील दक्षिण भारतातून दिसणारे शेवटचे कंकणाकृती सुर्यग्रहण पाहण्यासाठी रत्नागिरीतील ७ हौशी खगोलप्रेमी केरळ येथे गेले आहेत .व भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस त्यांचा धाकटा मुलगा मैञेय बोडस ,चार्टड अकाऊंटन्ट चिंतामणी काळे , कऱ्हाडे ब्राम्हण संघाचे अध्यक्ष माधव हिरलेकर , करसल्लागार विद्याधर जोशी व त्यांची पत्नी सौ प्रतिभा तसेच कन्या डॉ किरण जोशी हे सात जण केरळ येथील चर्वत्तुर येथे गेले आहेत.केरळमधील कान्हागड येथून या कंकणाकृती सुर्यग्रहणाचा मध्यबिंदू असून चर्वत्तुर येथे तीन मिनिटे सहा सेकंद इतका काळ कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार असून ९६% सुर्यबिंब झाकले जाणार आहे.यापूर्वी २००९ साली जानेवारी महिन्यात झालेले कंकणाकृती सुर्यग्रहण नऊ मिनिटे बारा सेकंद दिसले होते व त्यासाठी या सात खगोलप्रेमींसह अन्य काही गेले होते.त्यावेळी विख्यात शास्ञज्ञ कै डॉ मोहन आपटे हे तिरुअनंतपुरम येथे थांबले होते परंतु रत्नागिरीचा चमू कन्याकुमारी येथे गेला होता.
