स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये

0

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहताल लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे.

स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही 948 रुपये इतकी आहे. पण, लसीच्या दरात कराची जोड दिल्यास ही किंमत काहीशी वाढत आहे. सध्या स्फुटनिक लसीच्या जवळपास दीड लाख व्हायल्स भारतात आल्या आहेत. या लसीच्या एका डोससाठी 948 रुपये आणि त्यावर 5 टक्के जीएसटी असं मिळून एका स्फुटनिक लसीसाठी 995 रुपये मोजावे लागणार आहेत. स्फु़टनिक लसी चेही दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या लसींसाठी जवळपास 2 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीच्या उत्पादनाच्या दृष्टीने सध्या 6 वेगवेगळ्या कंपन्यांशी यासाठीचे करार करण्याची चर्चा आणि प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळं या लसीचं उत्पादन वाढल्यास, किंमत काही अंशी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे जगभरात वापरात असणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींपैकी स्फुटनिक ही 92 टक्के म्हणजेच सर्वाधिक प्रभावी लस ठरत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 14-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here