भाजपच्या प्रचारात माजी खासदार नीलेश राणेंची एंट्री

0

रत्नागिरी : भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारात माजी खासदार नीलेश राणे सक्रिय झाले आहेत. मिरकरवाडा, कोकणनगर, राजीवडा, विश्‍वनगर, उद्यमनगर आदीसह विविध भागांमध्ये ते मुस्लीम बंधू-भगिनी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रचारदौर्‍याला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी संकेत चवंडे, अशोक वाडेकर, मेहताब साखरकर, नित्यानंद दळवी, आलीम शेख, इंतिखाब पठाण, तन्सीम भाटकर, मन्सूर मुकादम, रफीक मुकादम, अकिल वस्ता, शोएब खान, उबेद होडेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here