लांजात ११ हजार ७३ जणांचे लसीकरण

0

लांजा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ११ मेपर्यंत ११ हजार ७३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीचा अनियमित पुरवठा, बुकिंगमधील सावळागोंधळ व अपुरे मनुष्यबळ या समस्यांवर मात करत उपलब्ध लसीच्या साठ्याचे नियोजन करून लसीकरण केले जात आहे.तालुक्यात ११ मेपर्यंत कोवॅक्सीनचा पहिला डोस ३ हजार १३८ लोकांना देण्यात आला तर ६०९ लोकांना दुसरा असे एकूण ३ हजार ७४७ डोसचे लसीकरण करण्यात आले. कोवीशिल्ड या लसीचा ७ हजार ९४० लोकांना पहिला आणि १ हजार ४९५ जणांना डोस देण्यात आला. तालुक्यातील ११ हजार ७८ लोकांना कोवीशिल्ड व कोवॅक्सीन या दोन्ही लसींचे पहिला व दुसरा डोस मिळून एकूण १३ हजार १८२ डोसचे लसीकरण करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 14-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here