नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिपळूण, अलोरे, पोफळीतील व्यापाऱ्यांवर कारवाई

0

चिपळूण : चिपळूण व शिरगाव पोलिसांच्या वतीने विविध ठिकाणी धाडी टाकून बुधवारी रात्री सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. शहरातील परकार कॉम्प्लेक्स, तालुक्यातील अलोरे, पोफळीतील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिपळूण न. प.चे प्रसाद साडविलकर यांनी परकार कॉम्प्लेक्समधील दोन दुकाने रात्री आठच्या सुमारास उघडी असल्याचे समजताच संबंधितांची चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एक चप्पल व कपड्याच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. अलोरेत एक चप्पल व्यावसायिक, पोफळी सय्यदवाडी येथे किराणा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 14-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here