ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण केले आहे. यावरून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची अफवा पसरवली जात आहे. याबाबत त्यांच्या कार्यलयातून खुलासा करण्यात आला आहे. सतत फोन करून विचारणा होत असल्या कारणाने खुलासा करण्यात आला आहे.
माझी प्रकृती नेहमी प्रमाणे सामान्य व स्थिर आहे. कोणताही त्रास होत नाही. मौनव्रत असल्याने त्यांचा सवांद हा लेखी स्वरुपात चालू आहे. अण्णा यांच्या प्रकृती विषयी चिंता करण्याचे कारण नाही. तसेच त्यांच्या प्रकृती विषयी अफवा देखिल कोणी पसरवू नये. जर कोणी समाजकंटक अशुभ बातम्या पसरवत असल्तील त्याकडे लक्ष देऊ नये. असं त्यांच्या कार्यलयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी आरोपींना शिक्षा करण्याची प्रक्रिया जलद व्हावी, या मागणीसाठी अण्णा हजारे शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण केले आहे. या आंदोलनासंदर्भात हजारे यांनी 10 डिसेंबर रोजी पंतप्रधानांना, तर 13 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे.
या निवेदनात महिलांच्या सुरक्षेबाबत मुद्दे आहेत. याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करावी यासह आणखी काही मागण्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पोलिस दलात सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या सूचनांवर तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने न्यायाधीशांची रिक्त पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हणाले आहे.
