रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई काजळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गावामध्ये पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. काजळी नदीचा उगम आंबा घाटातून होत असल्याने रात्रभर साखरपा येथे पडलेल्या पावसाने चांदेराई येथे पुराचे पाणी भरण्यास झाली सुरुवात झाली आहे. काजळी नदीचे हे पाणी भाट्ये खाडीला येऊन मिळते त्यामुळे समुद्राच्या भरती ओहटीचा परिणाम या पाण्याच्या पातळीवर होतो. आज पहाटेपासूनच पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. रत्नागिरी देवधे या मर्गावर चांदेराई बाजरपेठेत बाबा गुरव यांचे हॉटेल शेजारी मोरीवर पाणी भरल्याने थोड्याच वेळात वाहतूक बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. चांदेराई सरपंच शिल्पा दळी यांनी दुकानदारांना आपले सामान सुरक्षित स्थळी हलवण्याच्या केल्या सूचना केल्या आहेत.
