बंड्या साळवींसारखे सक्षम नेतृत्वच नगरपालिकेचा कारभार चालवू शकते; कुण्या येऱ्यागबाळ्याचे ते काम नाही

0

“काही महिन्यातच नगरपालिकेचा कारभार सक्षमपणे चालवून प्रदीप साळवींनी दाखवून दिलंय कि गतिमान प्रशासन म्हणजे नेमकं काय असतं. नळपाणी योजना, रस्ते, गटारे, नागरिकांच्या समस्या चुटकीसरशी सोडवण्याची धमक शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांच्यात आहे. ते कुणा येऱ्यागबाळ्याचे काम नाही” अशा शेलक्या शब्दात शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी विरोधकांना सुनावले आहे. शिवसेनेला सर्वच प्रभागातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचंड मताधिक्याने रत्नागिरीच्या विकासासाठी जनता प्रदीप साळवी यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून देईल असा विश्वास बिपीन बंदरकर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here