कझाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना, 100 प्रवाशी असलेल्या विमानाची इमारतीला धडक

0

अल्माटी, 27 डिसेंबर : कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ते दोन मजली इमारतीवर आदळले. या दुर्घटनेत विमानातील 7 प्रवाशी ठार झाल्याची माहिती आहे. विमानातून 100 जण प्रवास करत होते.

याबाबत मिळालेल्या माहितनुसार, अल्माटी इथून विमानाने उड्डाण केले. यामध्ये 95 प्रवाशी आणि 5 क्रू मेंबर होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते दोन मजली इमारतीला धडकले. हे विमान कोणत्या कंपनीचे होते हे समजू शकलेले नाही. घटनास्थळी आपत्कालीन यंत्रणा पोहचली असून बचावकार्य सुरू आहे.

टेक ऑफ केल्यानंतर विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरु झाले असून कझाकिस्तान सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष आयोगाची स्थापना केली आहे. दुर्घटनेची सविस्तर माहिती आणि विमान का कोसळले याचा शोध घेतला जाईल. जोपर्यंत सर्व काही समोर येत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या विमानांना उड्डाणासाठी बंदी घालण्यात येणार असल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथं लोकांची वस्ती आहे. दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना सुरक्षितपणे बाजूला काढण्यात आलं आहे. बेक एअरलाइन्सचे हे फोक्कर 100 विमान असून अशा प्रकारच्या विमानांच्या वापरावर आता तात्पुरती बंदी घातली आहे. आल्मटी ते नुर सुलतान साठी या विमानांचा वापर केला जायचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here