रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक हि बिनविरोध होणे गरजेचे होते. मात्र काही पक्षांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी हि निवडणूक लढवली आहे. येथील जनता हि शिवसेनेला मानणारी आहे त्यामुळे बंड्या साळवी यांचा विजय निश्चित आहे. विरोधी पक्षाच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्षांसह ४ आमदारांना रत्नागिरीत यावे लागते म्हणजेच विरोधकांना अपयशाची चाहूल लागली आहे अशी प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी दिली आहे
