भाजपची सत्ता गेलेली नाही, सत्ता ऑन द वे आहे : नारायण राणे

0

भाजपची सत्ता गेलेली नाही. सत्ता ऑन द वे आहे. आमची सत्ता केव्हाही येईन. मी यासंदर्भात आशावादी आहे, असं मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवार्देखील सडकून टीका केली. शिवसेना सत्तेवर असली तरी खरी सत्ता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे असल्याचा दावाही राणेंनी केला.

HTML tutorial

या सरकारमध्ये मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत की उद्धव ठाकरे असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “या सरकारमध्ये मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत की उद्धव ठाकरे? सर्व प्रश्नांची उत्तरं जयंत पाटीलच देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात उद्धव ठाकरेंच्या बाजूला जयंत पाटलांची खुर्ची आहे. त्यांना सत्तेत चान्स मिळाला नसता, तर भाजप-सेना सत्तेवर असती. तसेच सुभाष देसाईं यांच्याकडे युतीची सत्ता असतानाही उद्योगमंत्रिपद होते. आताही त्यांच्याकडं हेच खातं दिलं आहे. त्यामुळे उद्योग तेच चालू करतात आणि तेच बंद करतात. यालाच शिवसेना म्हणतात, असाही टोला राणेंनी लगावला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री नामधारी आहे. ते विचारलेल्या प्रश्नावर उत्तरही देऊ शकत नाही, असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.तर उद्धव ठाकरे घरी जे खातात तेच जेवण 10 रुपयांच्या थाळीत देणार आहेत का? असे म्हणत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कामगारांसाठी 10 रुपयांची थाळी योजना सुरु केली. पण या योजनेत सबसीडी आहे. यात उद्धव ठाकरेंचं योगदान काय? तुमच्या आमच्या खिशातूनच हे पैसे तिकडे जातात.” असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here