ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधात लढा सुरु असतानाच, सरकारच्या तयारीला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोविड जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये या सल्लागार ग्रुपची स्थापना केली होती. कोरोना संकटात डॉ. शाहिद जमील यांना केंद्र सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. SARS-CoV-2 विषाणूच्या जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकारने वैज्ञानिक सल्लागार ग्रुप बनवला होता, शाहिद जमील त्या ग्रुपचे अध्यक्ष होते. रविवारी (16 मे) त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. डॉ. शाहिद जमील यांनी ग्रुपचं अध्यक्षपद का सोडलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र काही वृत्तानुसार कोरोनाबाबत सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते समाधानी नव्हते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 17-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here