नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपने सुमारे अर्धा डझन आमदार आणि नेतेमंडळीना रत्नागिरीत आणलंय. स्नेह संमेलनात जाऊन भाषणं करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. भाजपची तथाकथित ‘तोफ’ आमची मत वाढवीत आहे. यामुळे कुणी कितीही वल्गना केल्या तरी बंड्या साळवी पहिल्या पाच प्रभागातच निवडून येतील. आम्ही केलेली विकासकामे आणि बंड्या साळवी यांचा संपर्क याच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला
