तौक्ते चक्रीवादळ : मुंबईत ऑरेंज अलर्ट; दोन वाजेपर्यंत मुंबई विमानतळ बंद; वांद्रे-वरळी सी-लिंक, मोनोरेल बंद

0

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केले असून याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे. चक्रीवादळ मुंबईपासून १६० किमी अंतरावर आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. वा-यामुळे कुर्ला स्थानकाजवळ एका ट्रकवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच स्थानिक सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई विमानतळावरून होणारी वाहतूक दुपारी दोन वाजेपर्यंत थांबवण्यात आली आहे. या वादळाचा परिणाम मोनोरेलवर पण झाला असून पुढील सूचना येईपर्यंत मोनोरेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच वांद्रे-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:39 PM 17-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here