रत्नागिरी
येथील भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिले.
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या बंदर येथे असलेल्या भारती शिपयार्ड ही जहाज बांधणीची कंपनी गेली पाच वर्षे बंद आहे. तेथील कर्मचार्यांीनी राजापूरचे आमदार राजन साळवी यांची येथील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात जनता दरबारात भेट घेतली आणि अनियमित पगाराची कैफियत त्यांच्याकडे मांडली. तसेच कंपनी लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.आमदार साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन भारती शिपयार्ड कंपनी सुरळीतपणे चालू होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वातसन दिले. यावेळी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, विभागप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण आणि कर्मचारी उपस्थित होते.
