ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज करण्यात आला. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना कॅबिनेट मध्ये स्थान देण्यात आले. मात्रीपादाची शपथ घेतल्यावर ना. उदय सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणच्या प्रमुख जिल्ह्यातून उद्धव ठाकरे साहेबांनी कॅबिनेट पदी माझी जी नियुक्ती केली आहे ती म्हणजे शिवसेनेने केलेला कोकणाचा सन्मान आहे. त्यांच्या मनात असणारा कोकण घडवण्यासाठी मी काम करणार आहे. बेरोजगारी हटवण्यासाठी प्रदूषणमुक्त प्रकल्प आणले जाणार आहेत. सागरी महामार्ग पूर्ण करून राष्ट्रीय महामार्गाचे ९१ किलोमीटरचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. रत्नगिरी शहर सर्वांग सुंदर बनवून, जिल्ह्यातील रस्ते पाण्याच्या समस्या सोडवणार आहे. कोकणाला सर्वांग सुंदर बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनखाली काम करण्याचा मनोदय ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
