राज्यघटनेच्या सरनाम्यातून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द वगळण्यात यावा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0

राज्यघटनेच्या सरनाम्यातून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द वगळण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते व संयोजक नंदकुमार यांनी केली आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दावर केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, कारण हा शब्द पाश्चिमात्यातून आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

HTML tutorial

लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे. नंदकुमार म्हणाले की, घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्दाला स्थान असणे गरजेचे नाही. तसेच संविधानाचे निर्मातेसुद्धा या शब्दाच्या विरोधात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्णस्वामी अय्यर यांच्यासह सर्वांनी या शब्दाबाबत चर्चा केली होती. तसेच घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द असू नये असे मत मांडले होते. तरीही त्यावेळी या शब्दाची मागणी करण्यात आली, चर्चा करण्यात आली, तसेच घटनेत हा शब्द समाविष्ट करू नये, असा निर्णयही घेण्यात आला होता.असे नंदकुमार म्हणाले.

पुढे बोलताना नंदकुमार म्हणाले, 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द समाविष्ट करण्यासाठी भर दिला. तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे याबाबतचे मत नाकारण्यात आले, असा दावाही त्यांनी केला.

धर्मनिरपेक्ष या शब्दाची भारतात गरज नसल्यामुळे धर्मनिरपेक्ष याबाबत बोर्ड लावण्याची खरच गरज आहे का? काम, व्यवहार आणि भुमिकेच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट सिद्ध करुन दाखवावी लागणार आहे. त्याचसोबत संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाच्या अस्तिवाची गरज नसून ते संविधानाच्या संस्थापकांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here