वृक्षारोपणाने आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या आठवणी झाल्या जाग्या

0

महाबळेश्वर : पोलादपूर मार्गावर असणाऱ्या आंबेनळी घाटात रत्नागिरी येथील दापोली कृषी विद्यापीठाचे बस दरीत कोसळली होती. या घटनेला २८ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त अपघातात मयत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी त्या आठवणी जाग्या करून वृक्षारोपण केले तसेच या ठिकाणीच रुग्णवाहिका सुरू करण्याचा संकल्प सोडला.

HTML tutorial

गतवर्षी २८ जुलै २०१८ रोजी पोलादपूर वरून महाबळेश्वरकडे येत असताना आंबेनळी घाटातील या ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठाची बस ६०० फूट खोल दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात ३० जण ठार झाले होते. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. रविवारी या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त ज्या लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी दाभोळ येथे येऊन अपघाताच्या आठवणी जाग्या केला. अपघाताला वर्ष झाल्यानंतरही पोलिसांची चौकशी पूर्ण न झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याचबरोबर जा लोकांना नातेवाईकांचा या अपघातात मृत्यू झाला होता त्यांचे जबाब घरी येऊन घ्यावेत अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी नातेवाईकांवर दबाव टाकून जबरदस्ती पोलिस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण न झाल्याने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here