“एकाही मुस्लिमाचं नागरिकत्व गेल्यास राजीनामा देईन”

0

गोरखपूर | सुधारित नागरिकत्व कायद्यांतर्गत माझ्या मतदारसंघातील एकाही मुस्लिम व्यक्तीला देशातून बाहेर काढल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असं भाजप नेते राधा मोहन दास अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

HTML tutorial

गोरखपूरमधील एकाही मुस्लिम व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, हा विश्वास देण्यासाठी मी मुस्लिम समुदायाच्या गाठीभेटी घेत आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलं आहे. ते गोरखपूरमध्ये सीएएच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

सीएएमुळे मुस्लिमांचं नागरिकत्व रद्द करुन घेण्यात येईल अशी माहिती समुदायाच्या मनात आहे का, ते जाणून घेण्याचा प्रयत्न संपर्क कार्यक्रमादरम्यान करण्यात येत आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.

दरम्यान, सीएए संदर्भात मुस्लिम नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here