गुजरातला चक्रीवादळाचा फटका

0

गांधीनगर : महाराष्ट्राच्या पश्चिम किनरपट्टीवर धुमाकूळ घातल्यानंतर तौक्ते चक्रीवादळाने आपला मोर्चा गुजरातकडे वळवलाय. गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमाभागातल्या गावांना बसला आहे. त्यामुळे एकूण 2400 गावे प्रभावित झाल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली.चक्रीवादळाचा केंद्रबिंदू सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या दीव नजीक पोहचला होता. सौराष्ट्रच्या किनारी भागात लँडफॉल झाल्यानंतर वादळाने सौराष्ट्रला जोरदार तडाखा दिला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 16 हजार 500 घरांचे नुकसान झालेय. सतर्कतेची उपाययोजना म्हणून संभाव्य प्रभावित क्षेत्रातील गावे आधीच खाली करण्यात आली होती. गुजरातच्या किनारी भागातून तब्बल 2 लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते. चक्रीवादळामुळे वीजेचे हजारो खांब उन्मळून पडले आहेत. या भागातले तब्बल 160 रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून 40 हजार झाडे उन्मळून पडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, चक्रीवादळामुळे अनेक भागातले रस्ते उखडल्यामुळे करोना काळात उपचारासाठीचे ऑक्सिजन किंवा इतर गोष्टींचे दळणवळण प्रभावित झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here