सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोवॅक्सीन लसीचे 2 हजार 200 डोस प्राप्त

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्याकरिता कोवॅक्सीन लसीचे 2 हजार 200 डोस प्राप्त झाले आहेत. ही कोवॅक्सीन लस ही ज्या नागरिकांना कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आले त्यांना प्राधान्याने दुसरा दोड देण्याकरिता राखीव आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील विद्युत सेवा व इंटरनेटसेवा काही ठिकाणी ठप्प झाल्याने कोवीड लसीकरण सत्राचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे.या लसीकरण सत्रामध्ये 45 वर्षावरील नागरीकांना दुसरा डोस दिला जणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यापैकी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही यावेळी दुसरा डोस दिला जाणार आहे. तरी ज्या नागरिकांना कोवॅक्सीनचा दुसरा डोस देय आहे त्यांनी उद्या 19 मे रोजी लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे. सदर लस ही लसीकरण केंद्रावर पुढील प्रमाणे उपलब्ध असणार आहे. कणकवली तालुक्यात कासार्डे येथे 160, देवगड तालुक्यात जामसंडे येथे 160, कुडाळ तालुक्यात माणगाव येथे 160, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे 160, सावंतवाडी तालुक्यात बांदा येथे 160 या प्रमाणे एकूण 800 लसी उपलब्ध असणार आहेत. त्याशिवाय उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येते प्रत्येकी 50 कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती नायर यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here