कर सल्लागार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. अभिजित बेर्डे

0

रत्नागिरी जिल्हा कर सल्लागार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजित बेर्डे यांची दोन वर्षांसाठी निवड झाली.
संस्थेची २०२० ते २०२२ या कालावधीसाठी व्यवस्थापक समिती निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेत बिनविरोध निवडणूक झाली. उपाध्यक्षपदी सीए वरदराज पंडित, सचिवपदी राजेश गांगण, खजिनदारपदी अॅड. उज्ज्वल बापट, समिती सदस्य म्हणून सीए मंदार गाडगीळ, रमाकांत पाथरे, नीलेश भिंगार्डे, दिनकर माळी, सीए मंदार देवल, चंद्रशेखर साप्ते आणि सीए अभिजित पटवर्धन यांची नियुक्ती झाली. नूतन कार्यकारिणीला सीए राजन संसारे, सीए उमेश लोवलेकर, सीए श्रीरंग वैद्य, प्रशांत लिमये, सचिन बारटक्के यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. समारोपाच्या भाषणात संस्थेचे माजी अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ यांनी संस्थेच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा सांगितला. सर्व सदस्यांनी गेली तीन वर्षे उत्तम साथ दिली. समिती सदस्यांनीही एकमताने निर्णय घेऊन संस्थेचे उपक्रम यशस्वी केले. त्याबद्दल संस्थेचे सदस्य व व्यवस्थापक समिती सदस्यांचे व संस्था सदस्यांचे आभार मानले. असेच सहकार्य नूतन कार्यकारिणी समितीला करावे आणि एकदिलाने संस्थेचे काम करावे, असे आवाहन केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here