छावा प्रतिष्ठान रत्नागिरी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

रत्नागिरी : श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेचा ७ वा वर्धापन दिनाचे औचित्त साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण २६ रक्तदात्यांनी कोरोनाच्या वाढत्या महामारीत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच ऍडव्होकेट सौ.रती सहस्रबुद्धे मॅडम, के.झेड टीम चे श्री.शुभमजी वाडकर साहेब, महाराष्ट्र एस. टी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रविणजी कांबळे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.सुनिलजी धावडे साहेब यांनी केले. तसेच छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे पदाधिकारी व सदस्य संघटक श्री.समीर धावडे, सचिव श्री. समीर गोताड, कार्याध्यक्ष श्री. संतोष आग्रे, खजिनदार श्री. गणेश कांबळे, चंद्रकांत गोताड, राहुल धावडे, रितेश धावडे, सचिन धावडे, निलेश कळंबटे, मुकेश धावडे,श्री. प्रशांत कांबळे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here