भारतीयांच्या कोरोना लसी निर्यात केल्या नाहीत : अदर पुनावाला

0

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या निर्यातीवरून विरोधक गदारोळ करीत असतानाच सीरम इन्स्टीट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी मोठा खुलासा केलाय. भारतीयांच्या वाट्यातील लशी निर्यात केल्या नाहीत असे स्पष्टीकरण अदर पूनावाला यांनी दिले आहे. तसेच आगामी 2 ते 3 महिन्यात संपूर्ण देशाचं लसीकरण शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहेयासंदर्भात पुनावाला यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार कोरोनाला रोखण्यासाठी लस खूप मोठं हत्यार आहे. मात्र, लस निर्मिती करताना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लसीकरण होण्यासाठी 2 ते 3वर्षे लागतील असे पुनावाला यांनी सांगितले. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरु झाले आहे. त्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. मात्र इतर देशातील करोना संकट पाहता आपण त्यांना मदतीचा हात दिला आणि लस निर्यात केली. त्याचीच प्रचिती म्हणून आज इतर देश भारताला मदत करत आहेत. हा करोना व्हायरस देशांच्या सीमेपर्यंत मर्यादीत नाही. त्यामुळे संपूर्ण जगाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या आहे. लोकसंख्या पाहता दोन ते तीन महिन्यात लसीकरण करणे अशक्य असल्याचे पुनावाला यांनी आपल्या पत्रकात नमूद केलेय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here