जिल्ह्यात ८७ हजार बालकांना रविवारी पल्स पोलिओ डोस

0

रत्नागिरी जिल्ह्यातील शून्य ते ५ वयोगटातील ८७ हजार ६८५ बालकांना येत्या रविवारी (दि. १९ जानेवारी) पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, चेक पोस्ट, विविध शाळा इत्यादी ठिकाणी एक हजार ९२५ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पोलिओसारख्या कायमचे अपंगत्व निर्माण करणाऱ्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यावर्षी येत्या १९ जानेवारीला पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन करण्यासाठी पल्स पोलिओ कार्यदल समितीची सभा आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. रविवारच्या मोहिमेनंतर २० ते २४ जानेवारी या कालावधीत पथकामार्फत घरोघरी जाऊन शिल्लक राहिलेल्या बालकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या मोहिमेअंतर्गत शून्य ते दोन वयोगटातील बालके आणि गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येते. या मोहिमेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून ९५.७० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. येत्या ३ ते १० फेब्रुवारी या कालावधीत तिसरा टप्पा आणि २ ते ९ मार्च या कालावधीत चौथा टप्पा राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here