पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना नोटीस

0

रत्नागिरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, नगरसेवक मुसा काझी आणि सोहेल साखळकर यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी कारवाईचा इशारा त्यावेळी दिला होता. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे शहर अध्यक्ष नीलेश भोसले यांनी स्पष्ट केले आहे. या नोटिशीला १५ दिवसांत संबंधितांनी उत्तर द्यावयाचे आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here