रत्नागिरीत २३ जानेवारीला योगासन स्पर्धा

0

योग सोसायटीची रत्नागिरी शाखा आणि पतंजली योगपीठ परिवारामार्फत येत्या २३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून कनिष्ठ गटात ९ ते १४ वर्षे तर वरिष्ठ गटांमध्ये १५ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणी सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक असून मुली व मुलांची स्पर्धा सस्वतंत्र गटात घेण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकासाठी कनिष्ठ गट २०० रुपये, वरिष्ठ गटासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. सांघिक गटासाठी कनिष्ठ गटासाठी ३०० रुपये, तर वरिष्ठ गटासाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क आहे. स्पर्धा तीन स्तरीय असून जिल्हा स्तरावर निवड झालेल्या मुलांची राज्य, केंद्र स्तरावर निवड केली जाणार आहे.स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांना आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र, ३ फोटो, शाळेचे पत्र आणणे आवश्यक आहे.पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. रमा जोग उपस्थित होत्या.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here