म्युकरमायकोसिससाठीही आता साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

0

नवी दिल्ली : कोरोनाशी लढत असतानाच त्यातून उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशीसारख्या नव्या आजारानी मेडिकल जगतासमोर एक नवं आव्हान उभं केलं आहे. देशातल्या वाढत्या केसेस पाहता आरोग्य मंत्रालयानं या आजारासाठीही साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजाराचाही आता साथीचे रोग नियंत्रण कायद्यात समावेश होणार आहे. देशात म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराचे संख्य वेगानं वाढू लागल्यानं केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे साथीचे रोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम आता याही आजारासाठी लागू होतील. देशाच्या आरोग्य मंत्रालयानं आज सर्व राज्य सरकारांना याबाबतचा आदेश जारी केला आहे.

म्युकरमायकोसिससाठीही आता साथ नियंत्रण कायदा लागू

साथीचे रोग नियंत्रण कायदा ( 1897) अंतर्गत आता म्युकरमायकोसिस हा लक्षणीय आजार म्हणून समावेश होणार आहे.

सर्व राज्य सरकारं, खासगी हॉस्पिटल्स यांना आजाराच्या चाचणीबाबत, उपचाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरनं दिलेल्या गाईडलाईन्स बंधनकारक राहणार आहे.

सर्व संशयित, आजारी रुग्णांच्या केसेस केद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळवणं बंधनकारक असेल.

एपिडेमिक अॅक्ट लागू झाल्यानंतर केंद्राला अंमलबजावणीसाठी विशेष अधिकार प्राप्त होतात. कायदा लागू करण्यासाठी नियम आखणाऱ्या सरकारांना कोर्टातल्या अपीलांपासूनही संरक्षण मिळतं.

ब्रिटीशांनी प्लेगच्या साथीत आणलेला हा कायदा कोविडपाठोपाठ आता म्युकरमायकोसिससाठीही लागू होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:31 PM 20-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here